सोमवार, १८ फेब्रुवारी, २०१३


'नवरात्रोत्सवात  रंगाची उधळण

               मुंबई शहरात नवरात्रोत्सावाची धामधूम सुरु असताना महिलांबरोबर अम्बामातेला रंगीबेरंगी साड्यांची बरसात होत  असताना दिसत आहे . लाल ,निळा , पिवळा ,हिरव्या साड्यांनी आई अंबामाता नटू थटू लागल्याचे दिसून येत आहे . 

धाकु प्रभुजी वाडी सार्वजनिक मंडळ, घोडपदेव, मुंबई  यांचे वतीने साजरा करण्यात येणाऱ्या नवरात्रोत्सवात अनेक  महिला भाविक भक्त गणांनी नऊ दिवसाच्या नऊ रंगी साड्या देविमातेला अर्पण केल्या आहेत. महागाई ... निवडणूक नाही अश्यातच सार्वजनिक मंडळाची आर्थिक स्थिती खालावालेली असताना navara~ रंगाचे वेड आणि त्यातून भाविक भक्त यांजकडून देवीला अर्पण केलेल्या साडी चोळी मुले सार्वजनिक मंडळांना दिलासा मिळाल्याचे जाणवत आहे.महिला  भाविक भक्त जणांमध्ये या देवीला दरवर्षी साडी चोळी चे नवस बोलले जातात. साडी चोळीचे नवस बोलल्याने डी. पी. वाडीची आई जगदंबा नवसाला पावते याचा बोलबाला स्थानिक परिसरात असल्याने या सार्वजनिक मंडळाला एक उत्पन्नाचे साधन लाभले आहे. नवस फेडावयाचा आहे तर रंगाच्या साड्या देऊन फेडू . यामुळे मंडळ कार्यकर्त्याकडे अगोदरच साड्या देऊन आमची साडी देवी मातेला नेसवा असा हट्ट होऊ लागला आहे.

धाकु प्रभुजी वाडी सार्वजनिक मंडळ, घोडपदेव, मुंबई हि एक सार्वजनिक विश्वस्त संस्था . नवरात्रौत्सव बरोबर सामाजिक विधायक कार्यात सातत्याने अग्रेसर असणारी संस्था. शैक्षणिक क्षेत्रांत

विद्यार्थ्यांना मदत ... दीपावली मध्ये वृक्ष रोप वाटप .... मोफत  आरोग्य तपासणी शिबीर ... विभागातील गोरगरीब गरजू मुलांच्या कलागुणांना वाव देण्याचे सातत्याने काम करीत आहे.या सार्वजनिक मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते श्री.कृष्णकुमार शेटे, निर्गुण थोरात  संदीप सूर्यवंशी, संजय खामकर आदि मंडळी जोमाने काम करीत आहेत.